गिरगाव प्रीमियर लीगचा आजपासून थरार

गिरगाव प्रीमियर लीगचा आजपासून थरार

 

दक्षिण मुंबईतील मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या गिरगाव प्रीमियर लीगचा थरार शनिवारपासून इस्लाम जिमखान्यावर रंगणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर होणारी ही स्पर्धा 6 आणि 7 मार्चला खेळवली जाणार आहे. दक्षिण मुंबई माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या लीगमध्ये खेळाडूंवर अक्षरशः आकर्षक बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे.

यंदाच्या जीपीएलचे खास आकर्षण म्हणजे दक्षिण मुंबईतील नामवंत क्रिकेटपटू या स्पर्धेत आपला खेळ दाखवणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन युवासेना उपसचिव व युवा व्हिजन अध्यक्ष प्रथमेश सकपाळ व गिरगाव बॉईज यांच्या वतीने करण्यात येणार आहे. जीपीएलसाठी 450 खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. स्पर्धेत 16 संघ खेळणार असून या स्पर्धेच्या झळाळत्या चषकाचा आणि संघांच्या जर्सीचे मुंबईचा रणजीपटू हार्दिक तामोरेच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य रहाणे, माजी कसोटीपटू यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच या स्पर्धेला हिंदुस्थानी संघ व मुंबई संघाचे नामांकित खेळाडूदेखील भेट देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;