लालू कवितेतून म्हणाले, नरेंद्र मोदी खोटारडे
नरेंद्र मोदी हे खोटारडे असल्याचे सांगत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर तोफ डागली. त्यांनी एक कविताच सादर केली. त्यांचा हा अंदाज एका हिंदी वृत्तपत्राने जनतेला दाखवला आहे. ‘इतके खोटे का आहे सगळे? कोण बोलते इतके खोटे? मोदी सरकारचे खोटे गाडून टाकण्याचा जनतेने केला आहे निर्धार,’ असे लालू यांनी कवितेतून म्हटले आहे.
‘नोकरी देण्याचे आश्वासन खोटे, इतिहासाच्या नावावार खोटे, विकासाच्या नावावर खोटी आश्वासने, आश्वासने आणि निर्धारही खोटा, प्रत्येक विचार खोटा, इकडे खोटे, तिकडे खोटे, डावीकडे, उजवीकडे, खोटे, घराणेशाहीच्या नावावर खोटे, भ्रष्टाचारावर खोटे बोलत आहेत हे लोक. जर कुणी भाजपमध्ये आले तर तो राजकीय धंदा आणि विरोधी पक्षात गेले तर तो गंदा,’ अशा शब्दांत लालूप्रसाद यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
झूठ का अंबार, मोदी सरकार
झूठ का दरबार, मोदी सरकार
झूड का भंडार, मोदी सरकार
झूठ का व्यापार, मोदी सरकार
झूठ की बयार, मोदी सरकार
झूठ की बहार, मोदी सरकार
झूठ की कतार, मोदी सरकार
झूठ शानदार, मोदी सरकार
झूठ जानदार, मोदी सरकार
झूठ जोरदार, मोदी सरकार
झूठ लगातार, मोदी सरकार
झूठ वजनदार, मोदी सरकार
झूठ बारंबार, मोदी सरकार
झूठ से सरोबार, मोदी सरकार
झूठ का कारोबार, मोदी सरकार
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List