राज्यातील 440 मतदान केंद्रांवर महिलाराज; पोलिसांपासून अधिकारी, कर्मचारी सर्वच महिला

राज्यातील 440 मतदान केंद्रांवर महिलाराज; पोलिसांपासून अधिकारी, कर्मचारी सर्वच महिला

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महिलांसाठी विशेष मतदान केंद्रेही ठेवण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला असणार आहेत. राज्यभरात अशा 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती असणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्रे’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार ही विशेष महिला मतदान केंद्रे बनवण्यात येणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रात कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

ठाणे जिह्यात अशी सर्वात जास्त 36 मतदान केंद्रे असणार आहेत. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्रे

नगर 12, अकोला 6, अमरावती 8, छत्रपती संभाजीनगर 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4, उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;