IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार साथ? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार साथ? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता

मुबंई इंडियन्सने आयपीएलच्या सतराव्या हंगामाची निराशाजनक सुरुवात केली आहे. कर्णधारपद हार्दिक पंड्याला दिल्यामुळे चाहते सुद्धा नाराज आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये पराभव आणि कर्णधार हार्दिकने घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे चहुबाजूंनी मुंबई इंडियन्सवर टीका केली जात आहे. या सर्व घटनांमुळे रोहित शर्मासुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा रोहित शर्माचा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका वृत्तवाहिनीला मुंबईच्या एका खेळाडूने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकने आतापर्यंत ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले आहे त्यावर रोहित शर्मा अजिबात खूश नाही. त्यामुळे आयपीएलचा हा हंगाम संपल्यानंतर रोहित मुंबईची साथ सोडू शकतो. तसेच रोहित आणि हार्दिकमध्ये काही मुद्यांवरून मतभेद आहेत. त्यामुळे ड्रेसिंग रुममधले वातावरण सुद्धा नकारात्मक आहे, अशी माहिती मिळत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;