महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार, विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार, विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवत असून तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात हिंदुस्थानच्या पूर्व आणि द्वीपकल्पीय प्रदेशातील काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) म्हणण्यानुसार 9 एप्रिलपर्यंत ईशान्य भागात जोरदार पाऊस आणि वादळाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवणार असून काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यातील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आयएमडीने रिपोर्टनुसार, 5 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, उत्तर अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तेलंगणामधील वेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसात काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;