खेड तालुक्यातील बोरज येथे 4 किलो गांजा जप्त; तिघांना अटक

खेड तालुक्यातील बोरज येथे 4 किलो गांजा जप्त; तिघांना अटक

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. खेड तालुक्यातील मौजे बोरज शिवफाटा येथे कारवाई करत पोलीसांनी 3 किलो 954 ग्रॅम गांजा पकडला आहे. आरोपींकडून वापरण्यात आलेले वाहन आणि तीन मोबाईलसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सक्त सूचना दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील बोरज शिवफाटा येथे अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करण्यात आली. पोलीसांनी असगाणी नवानगर येथून मोहन शिवशंकर कुशवाहा, वय 22, रा. खेर्डी, चिपळूण, शुभम संतोष गमरे, वय 23, रा. लोटे, घाणेखुंट, खेड आणि सचिन रामसहजीवन चौहान, वय 20, रा. असगाणी, नवानगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 3 किलो 954 ग्रॅम वजनाचा गांजा आणि त्यासोबत एक वाहन आणि तीन मोबाईल असा 1 लाख 48 हजार 190 रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय जाधव, सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे, सुरज भोळे, घुगरे, पाचवे आणि बोरकर यांनी केली.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;