इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? राहुल गांधींनी दिलं उत्तर

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? राहुल गांधींनी दिलं उत्तर

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचार सभांचं आयोजन केलं असून सगळीकडे प्रचाराचा जोर दिसून येत आहे. विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आपापल्या पक्षाच्या प्रचाराची कमान सांभाळलेली दिसून येत आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याविषयी राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शुक्रवारी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून जनतेला 25 गॅरेंटी म्हणजे आश्वासने दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यास ही सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही काँग्रेसने दिली आहे.

या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीनंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली. ते म्हणाले की, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आपापल्या विचारधारेसह ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे निकाल पाहूनच पंतप्रधान पदाच्या उमेदवाराविषयी निर्णय घेतला जाईल. हा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये घेतला गेला आहे. तसंच, आज हिंदुस्थान एक वैचारिक निवडणूक लढवत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा निवडणुकीनंतर घेतला जाणार आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;