जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली ,भाजपाच्या जाहिराती सरासपणे नगरमध्ये अद्यापही सुरू
लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन आता जवळपास 15 दिवस उलटून गेले. आचारसंहिता लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला नगर जिल्ह्यामध्ये केराची टोपी दाखवण्यात आली आहे. आजही भारतीय जनता पार्टीचे असलेल्या जाहिराती या सरासपणे नगर शहरांमध्ये दिसत आहेत.
आचारसंहितेचे पालन करावे असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी येथील प्रशासनाला दिले होते. यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. ज्या ज्या ठिकाणी जाहिरातींचे फलक लावलेले आहेत व ते एखाद्या राजकीय पक्षाचे असेल तर ते ताबडतोब काढून टाकण्यात यावे असे सांगण्यात आले होते. काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली खरी मात्र ती फक्त थातूरमातूरच झाली असे म्हणले तर वावगे ठरणार नाही .
नगर शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीने मागील महिन्यामध्ये आपकी बार 400 पार अशा घोषणा देत त्यांनी अनेक घरांवर भिंती या रंगवलेल्या होत्या. त्या भिंती आजही जाहिरातीच्या स्वरूपामध्ये दिसून येत आहे. नगर शहरांमध्ये सुद्धा या भिंती अशा प्रकारे रंगलेला दिसत आहे. वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनाने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान दुसरीकडे जिल्हा प्रशासन मात्र इतर पक्षांच्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय घेतात व त्याची अंमलबजावणी करतात. मात्र भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या जाहिराती अथवा पेट्रोल पंपावर असलेले जे जाहिरातीचे फलक आहेत ते अद्याप पर्यंत झाकले नाही. त्याबद्दल सुद्धा अनेकांच्या मनामध्ये शंका उपस्थित होऊ लागलेल्या आहेत. आता तरी प्रशासन कडक कारवाई करेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जर्मन या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांच्या संपर्क साधला असता संपर्क झालेला नाही ते बैठकीमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List