UPI Cash Deposit – पैसे जमा करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही, RBI ची मोठी घोषणा

UPI Cash Deposit – पैसे जमा करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही, RBI ची मोठी घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या चलनविषयक धोरण बैठकीत UPI संदर्भात मोठी घोषणा केली आहे. जर तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गत  लवकरच तुम्ही UPI वापरून तुमच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करू शकाल. परंतु ही सुविधा कधी सुरू होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI बाबत ही घोषणा केली आहे. लवकरच यूपीआयद्वारे कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करण्याची सुविधा सुरू केली जाईल. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार असल्याचे शक्तीकांता दास यांनी सांगितले. आता पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही. तुम्ही UPI द्वारे रोख रक्कम जमा करू शकाल. याशिवाय, पीपीआय (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) कार्डधारकांना पेमेंट सुविधा देखील प्रदान केली जाईल. या लोकांना थर्ड पार्टी यूपीआय ॲप्सद्वारे UPI पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्थाव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत डेबिट कार्ड हे केवळ कॅश डिपॉझिट किंवा पैसे काढण्यासाठी वापरले जात होते. परंतु जेव्हा यूपीआयची ही सुविधा येईल तेव्हा तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. UPI कार्डलेस कॅश डिपॉझिट सुविधा UPI कॅश काढण्यासारखीच असेल. म्हणजे ग्राहकाना त्यांच्या फोनवरून UPI सोबत जोडलेल्या एटीएममध्ये पैसे जमा करता येणार आहे. आता ग्राहक युपीआयच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. ज्याप्रमाणे एटीएम स्क्रीनवर युपीआयद्वारे पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे लवकरच UPI कॅश डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;