पुण्यात मोठी घटना! पोलिसाने चौकीतच झाडल्या स्वतःवर चार गोळ्या
पुण्यात शुक्रवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली. या घटनेने पुणे पोलीस दल हादरला आहे. खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहियानगर पोलीस चौकीत एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच गोळ्या झाडल्या. या घटनेत पोलिसाचा मृत्यू झाला आहे. भारत दत्ता आस्मर असे या घटनेतील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली? हे समजू शकलेले नाही. या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
भारत आस्मर हे खडक पोलीस ठाण्यात शिपाई होते. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी लोहियानगर चौकीत रात्रपाळीसाठी आले होते. बंदूक घेऊन ते पोलीस चौकीच्या वर असलेल्या खोलीत गेले. यानंतर अचानक त्यांनी स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भारत दत्ता आस्मर यांनी जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. ते कुठल्या कारणामुळे तणावात होते, हे अद्याप समजू शकले नाही. दहा वर्षांपूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List