धक्कादायक! शाळेने बलात्कार पीडितेला बारावीच्या परीक्षेला बसण्यापासून रोखले

धक्कादायक! शाळेने बलात्कार पीडितेला बारावीच्या परीक्षेला बसण्यापासून रोखले

बलात्कारपिडीत विद्यार्थीनीला एका महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्रक नाकारल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. शिवाय तिने परिक्षा दिली तर महाविद्यालयाचे वातावरण बिघडेल असे महाविद्यालयाकडून तिला सांगण्यात आले. तर महाविद्यालयाकडून ती चार महिने शाळेत न आल्याने तिला प्रवेशपत्र नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हे प्रकरण उघडकीय तेव्हा आले जेव्हा त्या विद्यार्थीनीने दुसऱ्या शाळेतील एका शिक्षकांना फोन केला, ज्यांनी तिला चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. अजमेरच्या बालकल्याण आयोगाने याबाबत तक्रार घेतली आहे.. आयोगाच्या अध्यक्ष अंजली शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यीनीकडून संपूर्ण घटना जाणून घेतली. त्याचा तपास सुरू आहे. मुलगी तिचा मार्चमध्ये हुकलेली परीक्षा ती पुन्हा कशी देईल याला प्राधान्य देत आहोत.

विद्यार्थीनीवर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका नातेवाईकाने अन्य दोन जणांसोबत मिळून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी विद्यार्थिनीला शाळेतून घरून अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या शाळेत येण्याचा शाळेचे वातावरण  बिघडू शकते. तिनेही त्या गोष्टीला होकार दिला आणि ती घरातूनच अभ्यास करत होती. मात्र परिक्षेसाठी ती जेव्हा प्रवेश पत्रिका घ्यायला शाळेत गेली त्यावेळी ती आता त्या शाळेतील विद्यार्थीनी नसल्याचे म्हंटले. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की, शाळेतून तिला घरुन अभ्यास करायला का सांगितले ते. कारण अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी तिच्या शाळेतील उपस्थितीवर आक्षेप घेतला.

अंजली शर्मा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्य़ा माहितीनुसार, ज्यावेळी त्या मुलीसोबत बोलल्या, त्यावेळी मुलगी फार निराश होताी कारण ती हुशार विद्यार्थीनी होती. तिने 10 वीत 79 टक्के मिळविले होते. जर ती 12वी बोर्ड परिक्षेला बसती तर ती चांगले मार्क मिळवू शकली असती. मात्र शाळेच्या निष्काळजीपणामुळे एक वर्ष वाया गेले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;