…तर मोदींचा पराभव निश्चित, पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले मतांचे गणित

…तर मोदींचा पराभव निश्चित, पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले मतांचे गणित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी मतांचे गणित मांडले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये 63 टक्के लोकांनी मोदींच्या विरोधामध्ये मतदान केले होते. मात्र ही मतं वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरली गेली आणि त्यामुळे मोदींचा पक्ष पुढे गेला. गेल्यावेळेप्रमाणे मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून मतांचे विभाजन झाले नाही तर मोदींचा पराभव निश्चित आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

विरोधातील मतांचे जास्तीत जास्त विभाजन कसे करता येईल असा प्रयत्न मोदींचा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी, एमआयएमम किंवा इतर पक्ष असतील… या विरोधकांच्या मतांचे विभाजन करून तुकडे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या वेगळ्या लढण्याच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.

ते पुढे म्हणाले की, आता यावर काय करावे याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या वेगळ्या उमेदवारीमुळे 9 ठिकाणी भाजपचे अतिरिक्त खासदार निवडून आले होते. त्यामुळे यंदा प्रकाश आंबेडकर यांनी मतांचे विभाजन करू नये, असे आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;