विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार, इंडिया आघाडीची बैठक संपन्न
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार विनायक राऊत यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा निर्धार इंडिया आघाडीने केला. यावेळी इंडिया आघाडीची एकत्रित निवडणूक प्रचार यंत्रणा राबवण्यावर चर्चा झाली.
एकीकडे महायुतीचा उमेदवार ठरत नसताना इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभानिहाय बैठका सुरु आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक पार पडली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलींद कीर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, प्रदेश अल्पसंख्याक जुबेर काझी, क्षेत्राध्यक्ष राजेंद्र महाकाळ, शहराध्यक्ष निलेश भोसले, मेहबूब मोंगल, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, दीपक राऊत, अश्विनी आगाशे, माजी नगरसेवक सईद पावसकर, मुजफ्फर काझी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, अन्सार मुल्ला, अखिल साखरकर, पल्लवी सावंत, मुन्वर सुलताना, फरजाना मस्तान, कल्पना भिसे, नजीर वाडकर, रवी घोसाळकर, राकेश मेढे, आलिया मजगावकर, बाळकृष्ण लवांदे, राजेंद्र पोकळे, सौ. प्रभुलकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List