Lok Sabha Election 2024: …तर आम्हीही घराणेशाहीची यादीच छापू, तेजस्वी यादव यांचा मोदींना इशारा
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. अशातच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाही मुद्द्यावर जबरदस्त पलटवार केला आहे. तेजस्वी यांनी सोशल मीडिया साइट ‘X’ वर पोस्ट शेअर करत पुन्हा घराणेशाहीचा उल्लेख झाल्यास आम्ही भाजपच्या घराणेशाहीची यादीच जाहीर करू असा इशाराच दिला आहे.
तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया साईट ‘X’ वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ई बिहार ह भैया, इहा कुछ भी हो सकेला!’ असे म्हणत पुढे लिहिले आहे की, तुमच्या माहितीसाठी सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या रॅलीत एकदाही घराणेशाहीवर बोलले नाहीत. आता आहे ते पुन्हा बोलणार नाहीत. मात्र पुन्हा त्यांनी घराणेशाहीचा उल्लेख केला तर आम्हीही भाजपमधील घराणेशाहीची यादीच छापू, जय हिन्द, जय बिहार! असे ट्वीट करत नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.
“ई बिहार ह भैया, इहा कुछ भी हो सकेला!”
आप सभी की जानकारी के लिए बता दूँ, प्रधानमंत्री जी ने आज की रैली में एक बार भी परिवारवाद का जिक्र नहीं किया। आशा है अब मेरे टोकने के बाद फिर करेंगे। फिर करेंगे तो हम भी सूची छपवा देंगे।
जय हिन्द, जय बिहार! #TejashwiYadav https://t.co/oZaT795qKg— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) April 4, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील पहिल्या टप्प्यातील चार मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत. योगायोगाने या चारही जागांवर शंभर टक्के घराणेशाहीचेच उमेदवार आहेत. त्यापैकी दोन तथाकथित प्रादेशिक घराणेशाही पक्षांचे आहेत आणि दोन देशातील सर्वात मोठ्या घराणेशाही आणि घराणेशाही नेत्यांनी भरलेल्या पक्षाचे आहेत असेही तेजस्वी यादव ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी यांनी विचारले पाच प्रश्न
– गेल्या दहा वर्षात जमुई येथे किती कारखाने उभारलेत?
– 10 वर्षात केंद्राकडून जमुईसाठी किती निधी दिला?
– 10 वर्षात जमुईमध्ये कोणता नवा प्रकल्प दिला?
– 10 वर्षात केंद्र सरकारडून जमुईच्या तरुणांसाठी किती नोकऱ्या दिल्या?
– गेल्या दहा वर्षात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराव्यतिरिक्त तुम्ही जमुईमध्ये का विकास कामांसाठी फिरकलात
तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्या जमुई येथील दौऱ्याआधी पाच प्रश्न विचारले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List