विवाहितेचा हाय व्होल्टेज ड्रामा; नवरा हवा अन् प्रियकरही हवाय…

विवाहितेचा हाय व्होल्टेज ड्रामा;  नवरा हवा अन् प्रियकरही हवाय…

 

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे काल अजब घटना घडली. शेजाऱयाच्या प्रेमात बुडालेली एक विवाहित महिला विजेच्या खांबावर चढली आणि एक हाय वोल्टेज ड्रामा सुरू झाला. प्रियकराला घरात ठेवावे, अशी मागणी तिने नवऱयाकडे केली होती. नवऱयाने ही मागणी फेटाळल्यावर महिला हट्टाला पेटली आणि थेट विजेच्या खांबावर गेली. ही घटना गोरखपूरमधील पिपराइच पोलीस ठाणे परिसरात घडली. विवाहितेचे काही वर्षांपासून शेजारच्या गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. महिलेच्या नवऱयाचे नाव राम गोविंद असे असून तो मजूर आहे. राम गोविंदला जेव्हा पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल समजले तेव्हा त्याने तिला जाब विचारला. त्यावेळी पत्नीने प्रियकराला घरातच ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केली. पतीने ठाम नकार दिल्यावर वाद वाढला आणि प्रकरण रस्त्यापर्यंत आले. रागाच्या भरात महिला विजेच्या खांबावर चढली. हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;