मोदी गॅरेंटी फसवी अन् खोटी, अजिबात मत देऊ नका; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

मोदी गॅरेंटी फसवी अन् खोटी, अजिबात मत देऊ नका; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘मोदी गॅरेंटी खोटी आहे. भाजपने मोदी गॅरेंटी घेत गहू आणि तांदळाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आता शेतकऱ्यांची वेळ आहे. आता आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा भाजपचे नेते मत मागायला आले तर त्यांच्या हातात मूठभर गहू, मूठभर तांदूळ द्या आणि सांगा आधी आश्वासन पूर्ण करा. दिलेले आश्वासन त्यांना पाळता येत नसेल तर त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही’, अशी टीका जीतू पटवारी यांनी केली.

सतना येथे काँग्रेस उमेदवाराच्या रॅलीत Jitu Patwari यांनी ही टीका केली. मोदींची गॅरेंटी खोटी निघाली आहे. गव्हाला 2700 रुपये प्रतिक्विंटल आणि तांदळाला 3100 रुपये प्रतिक्विंंटल भाव मिळेल, अशी ‘मोदी गॅरेंटी’ भाजपने दिली होती. पण तसे झाले नाही. दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नसतील तर त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, असे ते जीतू पटवारी पुढे म्हणाले. उमेदवारी रॅलीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह, राज्यसभा सदस्य विवेक तंखा, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव हेही उपस्थित होते.

भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. प्रशासन भाजपचे नोकर बनून काम करत आहेत. आता काँग्रेस आणि समाजवादी पार्टी असे एक-एक मिळून अकरा आहेत. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही पन्ना येथे जीतू पटवारी यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;