‘ही’ ठरली सर्वोच्च महामालिका; टीआरपी स्पर्धेत मिळवलं ‘नंबर वन’ स्थान
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपी स्पर्धेत 'नंबर वन' पदावर आहे. ही मालिका सर्वोच्च महामालिका ठरली आहे. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली आहे.
2022 च्या अखेरीस सुरु झालेली ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा प्रेक्षकांना खूपच आवडतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्टनुसार 'ठरलं तर मग' ही मालिका पुन्हा एकदा अग्रस्थानी आली आहे. या मालिकेचा टीआरपी 8.9 इतका आहे. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे सायली आणि अर्जुनच्या भूमिकेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List