मद्य घोटाळा भाजपनेच केला, सर्वोच्च नेतृत्व सामील; केजरीवालांविरोधात साक्ष देणाऱ्याला NDA कडून तिकीट

मद्य घोटाळा भाजपनेच केला, सर्वोच्च नेतृत्व सामील; केजरीवालांविरोधात साक्ष देणाऱ्याला NDA कडून तिकीट

आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंगात बाहेर आल्यानंतर शुक्रवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्रातील भारतीय जनता सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मद्य घोटाळा भाजपनेच केला असून यात भाजपचे सर्वोच्च नेतृत्व सामील असल्याचा गंभीर आरोप संजय सिंह यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशमध्ये एनडीएकडून तिकीट मिळालेल्या मगुंटा रेड्डी यांनी तीन जबाब दिले असून त्यांचा मुलगा राघव एम. रेड्डी याने सात जबाब दिला आहे.

16 सप्टेंबर 2022 रोजी वायएसआर खासदार रेड्डी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. फेब्रुवारी 2023मध्य़े त्यांचा मुलगा राघव एम. रेड्डी याला अटक करण्यात आली. त्यानेही सात पैकी सहा जबाबांमध्ये केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. मात्र 5 महिन्यांच्या छळानंतर राघव रेड्डी याने केजरीवाल यांच्याविरोधात जबाब दिला, असा आरोप संजय सिंह यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;