अंगणवाडी सेविकेची कन्या झाली एमबीबीएस!

अंगणवाडी सेविकेची कन्या झाली एमबीबीएस!

कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर आकाशालाही गवसणी घालता येते. राहता तालुक्यातील कोऱहाळे येथील राजाराम कालेकर या साई संस्थानमधील कर्मचारी व आई अंगणवाडीसेविका सुरेखा या दाम्पत्याची मुलगी प्रियंका कालेकर हिने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले की, बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे.

कोऱहाळे गावातच तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले, नंतर निट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तिला 585 गुण मिळाले. त्या गुणांच्या आधारे पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना खर्चासाठी पैसे मागताना अनेक वेळा विचार करावा लागायचा, यामुळे अनेकदा इच्छा असूनही त्याला मुरड घालावी लागल्याचे प्रियंकाने सांगितले.

कोऱहाळे येथील श्रीगणेश शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी सांगितले, ‘प्रियंकाने गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळविले. श्री गणेश शिक्षण संस्थेत तिने विज्ञान शाखेत अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 95 टक्के गुण मिळविले. फिजिक्समध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळविले होते. तिने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;