‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्र झेपावले
हिंदुस्थानने ओडिशाच्या तिरावरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून नवीन जनरेशनची बॅलेस्टिक क्षेपणास्र ‘अग्नि प्राईम’ची यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली. बुधवारी सायंकाळी बरोबर सात वाजता डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि स्ट्रटेजिक पर्ह्सेस कमांड (एसएफसी) यांच्या मदतीने हे प्रक्षेपण करण्यात आले. प्रमुख संरक्षण अध्यक्ष जनरल अनिल चौहान, एसएफसी प्रमुख समीर व्ही कामत आणि डीआरडीओ तसेच हिंदुस्थानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List