जम्मू-कश्मीर – उरीमध्ये घुसखोरीचा डाव जवानांनी उधळला, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-कश्मीर – उरीमध्ये घुसखोरीचा डाव जवानांनी उधळला, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा डाव सुरक्षा जवानांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या बाजूने काही दहशतवादी हिंदुस्थानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच अलर्ट जवानांनी त्यांना रोखले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला टीपले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

उरी सेक्टरमधील सबुरा नाला रुस्तम येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवानांना संशयास्पद हालचाल दिसून आली होती. त्यानंतर जवानांनी घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. याला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असून येथे अद्यापही धुमश्चक्री सुरू असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयित दिसल्याची माहिती मिळताच पोलीस, लष्करी जवान आणि सीआरपीएफने शोधमोहीम सुरू केली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत शोधमोहिमेत यश मिळाले नाही. थन्नामंडी तालुक्यात येणाऱ्या डोरी माल जंगलामध्ये दुपारच्या सुमारास तीन संशयित दिसल्याची माहिती खबऱ्याने सुरक्षा दलाला दिली होती. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;