20 हजार हत्तींचे जर्मनीला टेन्शन
जर्मनीतील लोकांनीही हत्तींसोबत एकत्र राहण्याचा अनुभव घ्यावा, जसे ते आम्हाला करायला सांगत आहेत, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. जगातील हत्ती लोकसंख्येपैकी एक तृतीयांश बोत्सवानामध्ये राहतात. येथे त्यांची संख्या एक लाख 30 हजारांहून अधिक आहे. हिंदुस्थानातील हत्तींच्या लोकसंख्येपेक्षा हे प्रमाण चार पट जास्त आहे. बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री मिथिमखुलू यांनी गेल्या महिन्यात ब्रिटनला धमकी दिली होती. ते म्हणाले होते, आम्ही लंडनमधील हाईड पार्कमध्ये दहा हजार हत्ती पाठवतो. यामुळे तेथील लोकांना हत्तींसोबत राहणे कसे असते हेदेखील कळेल. बोत्सवानाच्या काही भागांत माणसांपेक्षा हत्तींची संख्या जास्त आहे. पिकांसोबतच आत येताना ते लहान मुलांनाही चिरडतात, त्यामुळे ते हत्तीच्या रोजच्या त्रासाला पंटाळले आहेत.
जर्मनीच्या पर्यावरणमंत्र्यांनी हत्तींच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केल्याने आणि बोत्सवानामध्ये जाऊन हत्तींची शिकार करण्यावर व नंतर त्यांची आयात करण्यावर काही निर्बंध घालायला हवेत, असे म्हटल्याने बोत्सवानाने जर्मनीला धमकी दिली आहे. बोत्सवानाचे राष्ट्रपती मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला 20 हजार हत्ती पाठवण्याची धमकी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List