बॉक्स ऑफिस आहे भावा इन्स्टाग्राम रील नाही; कोणावर भडकला करण जोहर?

बॉक्स ऑफिस आहे भावा इन्स्टाग्राम रील नाही; कोणावर भडकला करण जोहर?

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विविध पोस्ट लिहून करण बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही लोकांवर निशाणा साधत असल्याचं पहायला मिळतंय. नुकतीच त्याने मेकअप, प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स यांचा उल्लेख करत एक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता करणने चित्रपटांविषयी पोस्ट लिहित कोणाला टोमणा मारला आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये करणने कोणाचा उल्लेख केला नाही, मात्र त्याचा रोष हा ठराविक कलाकारांकडे असल्याचं कळतंय.

करण जोहरची पोस्ट-

करणने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘मोठ्या पातळीवर बनवायचं असेल तर तसं बनवा. ॲक्शन चालत असेल तर ॲक्शन बनवा. लव्ह स्टोरी चालत असेल तर लव्ह स्टोरी बनवा. चिक फ्लिक हिट होत असेल तर तिथे जा. वातावरण प्रत्येक आठवड्याला बदलत असतो. विश्वास प्रत्येक आठवड्याला मरतो. हे बॉक्स ऑफिस आहे भावा, इन्स्टाग्राम रील नाही. 30 सेकंदांच्या ट्रेंडमध्ये अडकून तिथल्या तिथेच राहून जाणार.’

करणने त्याच्या या पोस्टद्वारे कोणावर निशाणा साधला आहे, असा प्रश्न नेटकरी करत आहेत. याआधीही त्याने कोणाचाही उल्लेख न करता ‘फेक ब्युटी’वरून टीका केली होती. ‘फिलर्स लावल्याने पूर्तता येत नाही. मेकअप लावल्याने वय कमी होत नाही. करून घ्या जितके बोटॉक्स करायचे आहेत, एखाद्या मधमाशीने चावल्यासारखेच दिसाल. नाक बदलल्याने घाणेरडा वास अत्तर बनत नाही. प्लास्टिक सर्जरीने तुमचं बाहेरील रुप बदलूही शकतं, पण मेरी जान.. मूळ आत्मा बदलत नाही’, असं त्याने लिहिलं होतं. करणची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

करण जोहरने याआधीही अनेकदा अशा प्रकारचे पोस्ट लिहिले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने वेळेची किंमत समजण्यावरून पोस्ट लिहिली होती. ‘वक्तशीरपणाबद्दल एक कमालीची बाब म्हणजे याच्यासाठी नैसर्गिक प्रतिभा असणं, डिग्री असणं किंवा आई-वडिलांच्या मंजुरीची गरज नसते. ही कोणती कला नाही, जी आपल्याला वारसाने मिळेल. हा सर्वसामान्य शिष्टाचार आहे. जो इतर लोकांच्या वेळेचा आदर करतो, त्याचा आदर आपोआप होतो’, असं त्याने लिहिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;