भ्रष्टाचार दडपण्यासाठीच तटकरेंनी घेतल्या भाजपच्या कुबड्या, रोहे, नागोठण्यात इंडिया आघाडीचा मेळावा
रोहे व नागोठणे येथे आज इंडिया आघाडीचा जोरदार मेळावा झाला. यावेळी रायगड लोकसभेचे उमेदवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, विश्वासघात हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. विकासासाठी आम्ही तिकडे गेलो असे फुटीर सांगतात, पण भ्रष्टाचार दडपण्यासाठीच त्यांनी भाजपच्या कुबड्या घेतल्या अशी टीका अनंत गीते यांनी केली.
दोन्ही मेळाव्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, कोकण पदवीधर मतदार संघाचे प्रचार यंत्रणाप्रमुख किशोर जैन, तालुकाप्रमुख समीर शेडगे, सरपंच सुप्रिया महाडिक, शेकापचे शंकरराव म्हसकर, तालुका संपर्कप्रमुख शैलेश फुलारे, उपतालुकाप्रमुख महादेव साळवी, माजी सरपंच मिलिंद धात्रक, संजय महाडिक, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, विभागप्रमुख नितीन वारंगे, शाखाप्रमुख नीलेश वारंगे, विष्णू लोखंडे, राजेश काफरे, दुर्गेश नाडकर्णी, कुलदीप सुतार, संतोष खेरटकर, यतिन धुमाळ, अमीर तेलंगे, नीता हजारे, समीक्षा बामणे, अमृता साळुंखे, युवासेना तालुका पदाधिकारी राम महाडिक, जयेश माने, अनिश शिंदे, कामगार आघाडीचे अॅड. हर्षद साळवी, सुनील मुटके, सागर भगत, नंदकुमार बामुगडे, ज्ञानेश्वर दळवी उपस्थित होते. दरम्यान, रोह्याचे ग्रामदैवत धावीर महाराज यांचे दर्शन घेऊन गीते यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महिलांवर अनन्वित अत्याचार झाले. या अत्याचारांकडे राजकीय खेळी म्हणून बघणारा भाजप आहे. ‘मन की बात’ करणारे यावर बोलत नाहीत, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List