जेऊर ग्रामीण रुग्णालयाची वीज तोडली, अंधारातच उपचार सुरू; नागरिकांमध्ये संताप
जेऊर ग्रामीण रुग्णालयातील वीज बिल थकल्यामुळे महावितरणने रुग्णालयाची वीज तोडली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अंधारातच कामकाज सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जेऊरसह इतर परिसरातून ग्रामस्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात. रात्री-अपरात्री एखादा रुग्ण गंभीर परिस्थितीत दवाखान्यात आला तर त्याच्यावर उपचार कसा करायचा, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे.
करमाळा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जेऊर गावात परिसरातील 20 ते 25 किमी अंतरावरून लोक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येतात. या गावांमध्ये ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दोन्हीही एकाच ठिकाणी चालवली जातात. सुरुवातीपासूनच या ठिकाणी वीज बिलाचा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेक दिवस सवलत दिल्यानंतर आता महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील साहित्यासह परिसरातील उपचार घेण्यास आलेल्या रुग्णालाही याचा धोका निर्माण झाला आहे.
दिवसभर या ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी असतात क रुग्णांना सेवा देतात. परंतु रात्री-अपरात्री कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यांना कशा पद्धतीने सेवा देणार हा मोठा प्रश्न आहे. सध्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता सुरू आहे. तर त्यापूर्की गाजाकाजा करत महाराष्ट्रभर आरोग्यसेका पुरकठय़ाबाबत कौतुक करत स्कतŠची पाठ थोपटणारे आरोग्यमंत्री क पदाधिकारी याकडे का लक्ष देत नाहीत. आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी साकंत यांच्या तालुक्याशेजाराल करमाळय़ात अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणचा विचार न केलेला बरा, अशी चर्चा सुरू आहे.
जेऊरसह परिसरातील लोक या ठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु रात्री-अपरात्री विजेअभाकी रुग्णांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्यापूर्की विजेची सोय करणे गरजेचे आहे. रुग्णालयाचा वीजपुरकठा पूर्करत न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या कतीने आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आरोग्यमंत्री सावंत यांच्या कार्यक्रमांनाही विरोध करू, असा इशारा देण्यात आला आहे. जेऊर ग्रामीण रुग्णालयाकडे मागील तीन वर्षांपासून विजेची थकबाकी असून, ही थकबाकी सहा लाख रुपये असल्याचे समजते. याबाबत जेऊर महाकितरणच्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List