दहा वर्षे खासदारकी भोगूनही जनता बारणेंना ओळखत नाही, संजोग वाघेरे यांचा पलटवार

दहा वर्षे खासदारकी भोगूनही जनता बारणेंना ओळखत नाही, संजोग वाघेरे यांचा पलटवार

मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघांसह सहा मतदारसंघ येतात. लोकांपर्यंत पोहोचत असताना मी पिंपरी-चिंचवडचा महापौर असताना केलेली विकासकामे सांगत आहे. त्याची मला जराही लाज वाटत नाही, पण गेली 10 वर्षे खासदारकी भोगल्यानंतरही या मतदारसंघातील जनता तुम्हाला ओळखत नाही, असा पलटवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांनी मिंधे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर केला आहे.

संजोग वाघेरे यांनी पहिल्या टप्प्यातच प्रचारात आघाडी घेतली आहे. ते मावळमधील तीन आणि रायगडातील उरण, पनवेल, कर्जत-खालापूरच्या गावागावात पोहोचत आहेत. वाघेरे यांना मी पिंपरी-चिंचवडचा महापौर होतो हे लोकांना सांगावे लागत असल्याची टीका मिंधे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली. त्याला वाघेरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

मतदारांच्या प्रश्नांचे आधी उत्तर द्या!

मी 30 वर्षे राजकारणात आहे. पिंपरी-चिंचवडचा महापौरही होतो. या काळात मी केलेली विकासकामे जनतेला माहीत आहेत. मावळ मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रांतील वाड्यावस्त्यांवर फिरताना खासदार आमच्याकडे फिरकलेले नाहीत असे मतदार सांगत आहेत. दहा वर्षे खासदारकी भोगून जनता तुम्हाला ओळखत नाही त्याचे उत्तर आधी द्या, असा टोलाही वाघेरे यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;