मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक यांचे निधन
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक यांचे वयाच्या 58 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पालीवाला महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक पुराणिक यांनी सहयोगी प्राध्यापक म्हणून 34 वर्षे काम केले. त्यानंतर 2005 ते 2014 दरम्यान त्यांनी उपप्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक म्हणून उत्तम काम केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List