विजयासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये आज द्वंद्व

विजयासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये आज द्वंद्व

आयपीएलची सर्वोच्च धावसंख्या करणारी सनरायझर्स हैदराबाद आणि आयपीएलचा सर्वोत्तम संघ चेन्नई सुपरकिंग्ज आमनेसामने येत आहेत. उभय संघ आपल्या अखेरच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे विजयाचा झेंडा फडकावण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत.

एका पराभवामुळे चेन्नईने आपले अव्वल स्थान गमावले आहे आणि ते पुन्हा काबीज करण्यासाठी त्यांना आता सातत्यपूर्ण कामगिरीच करावी लागणार आहे. गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या 192 धावांच्या आव्हानाचाही चेन्नई यशस्वी पाठलाग करू शकली नव्हती. त्यामुळे त्यांची थोडक्यात विजयाची हॅटट्रिक हुकली आणि त्यांना अव्वल स्थानही गमावावे लागले. दुसरीकडे मुंबईविरुद्ध 277 धावांचा वर्षाव करणाऱया हैदराबादला गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध सहज पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्याकडे एडन मार्करम, हेन्रीक क्लासन, ट्रव्हिस हेडसारखे फुल फॉर्मात असलेले विदेशी फलंदाज आहेत. उद्या त्यांची बॅट लागली तर चेन्नईच्या गोलंदाजांची काही खैर नाही. चेन्नईची फलंदाजीही रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेलवर अवलंबून आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांचीही बॅट तळपली तर चेन्नईला कोणतेही लक्ष्य गाठणे कठीण नाही. गेल्या काही सामन्यांत रवींद्र जाडेजा आणि महेंद्र सिंग धोनीपर्यंत चेन्नईला फलंदाजी येतच नाही. तरीही दिल्लीविरुद्ध जाडेजा-धोनीवर षटकार-चौकार खेचण्याची जबाबदारी पडली होती. त्यात धोनी यशस्वीही ठरला, पण चेन्नईने सामना आधीच गमावला असल्यामुळे ती लढाई दिल्लीनेच जिंकली होती.

उद्याचा सामनाही दोन्ही सामन्यांसाठी महत्त्वाचा आहे. जो जिंकेल तोच प्ले ऑफच्या शर्यतीत धावत राहील. त्यामुळे पराभवाची झळ बसलेले हे दाक्षिणात्य संघ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांची फलंदाजीही मजबूत आहे आणि गोलंदाजीही. त्यामुळे उद्या कोणाची सरशी होईल याचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही. पण पुन्हा एकदा हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर धावांचा पाऊस पडण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;