ठाणे महापालिकेने विजेतेपद राखले

ठाणे महापालिकेने विजेतेपद राखले

 

ठाणे महापालिकेने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत 48 व्या ठाणे वैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटाचे सलग दुसऱया वर्षी विजेतेपद कायम राखले. प्रतिस्पर्धी संघाला 80 धावांत गुंडाळल्यावर ठाणे महापालिकेने दोन विकेट्सच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.  दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या निर्णायक लढतीत ठाणे महापालिकेच्या चतुरस्र माऱयासमोर डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे फलंदाज  खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. अतिश गावंडने 12 धावांत तीन, शशिकांत कदम, नंदन कामत आणि सौद मन्सुरीने प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांना शतकी धावसंख्येच्या आत रोखले. अनुराग यादवने 26, केतन खरातने नाबाद 16 आणि प्रदीप शर्माने 15 धावांचे योगदान दिले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;