सुमार आणि निराशाजनक! प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग दिल्लीच्या खेळाडूंवर भडकला

सुमार आणि निराशाजनक! प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग  दिल्लीच्या खेळाडूंवर भडकला

आयपीएलच्या इतिहासातील 272 ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारणाऱया कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंगने घोर निराशा व्यक्त केली. आमच्या संघाने पहिल्या डावात अतिशय सुमार आणि निराशाजनक कामगिरी केली. संघाला अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘सामन्याच्या सुरुवातीला आमच्या खेळाडूंचा खेळ पाहणे अतिशय निराशाजनक होते. गोलंदाजांनी तब्बल 17 वाइड चेंडू टाकले. 20 षटके टाकण्यासाठी आम्हाला दोन तास लागले, ज्यामुळे आम्ही वेळेनुसार दोन षटके मागे होतो. याचा अर्थ शेवटची दोन षटके टाकणाऱया गोलंदाजाला वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांसह गोलंदाजी करावी लागली. या सामन्यात बऱयाच गोष्टी घडल्या आहेत ज्या अस्वीकार्य आहेत आणि बऱयाच गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही ड्रेसिंग रूममध्ये खुलेपणाने संवाद साधू, असे पॉण्टिंग म्हणाला. पॉण्टिंग पुढे म्हणाला, ‘केकेआरने पॉवरप्लेमध्ये धावांची लयलूट केली. 6 षटकांनंतर त्यांनी धावफलकावर जवळपास 90 धावा लावल्या होत्या. या धक्क्यातून आमच्या गोलंदाजांना पुनरागमन करता आले नाही. त्यातच आमचे क्षेत्ररक्षणही गचाळ झाले. तिसऱया क्रमांकावर फलंदाजी आलेल्या अंगक्रिश रघुवंशा या युवा खेळाडूने जबरदस्त फलंदाजी केली. त्याच्यामुळेच रसेल आणि इतर खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करता आला. आता आम्हाला पुढील सामन्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल, हे पाहावे लागेल.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;