राहुल गांधी, प्रियांका गांधी विदर्भ दौऱयावर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र दौऱयावर येणार आहेत. राहुल गांधी यांची विदर्भातील भंडाऱयातील साकोली येथे 13 एप्रिलला तर चंद्रपूर येथे प्रियांका गांधी यांची चंद्रपूरला 15 एप्रिलला सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक येथे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विधानसभा मतदारसंघ साकोली आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द राहुल गांधी येत आहेत, तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी चंद्रपूर येथे सभा घेणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List