मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत, प्रकाश राज यांचा भाजपला टोला
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या भाजप एण्ट्रीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. दरम्यान प्रकाश राज यांनी ‘मला विकत घेण्याइतके ते वैचारिकदृष्टय़ा श्रीमंत नाहीत,’ असा टोला ट्विट करत लगावला आहे.
प्रकाश राज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा भाजपवर तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. प्रकाश राज हे आज तीन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती. यावर ‘मला वाटते त्यांनी प्रयत्न केला, पण मला विकत घेण्याइतके ते (वैचारिकदृष्टय़ा) श्रीमंत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले असावे… तुम्हाला काय वाटते मित्रांनो?’, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
n अभिनेते प्रकाश राज काही महिन्यांपूर्वी मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शनने अनेकांचे लक्ष वेधले होते. 2014 पासून रोज पडलेलं कोडं, मला सांगा नेमकं काय रिकामं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असलेला फोल्डर? त्यांच्या जॅकेटचा खिसा की त्यांच डोकं? या आशयाचं ट्विट करत त्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List