पुढचे 20 दिवस झोपू नका

पुढचे 20 दिवस झोपू नका

अमरावती लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रचारातून जोरदार हल्ले करायला सुरुवात केली आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती ज्वाला होते. त्यामुळे पुढील 20 दिवस झोपू नका, विरोधकांची झोप उडवा, असे भावनिक आवाहन बच्चू कडू यांनी केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघात ‘प्रहार’चे उमेदवार दिनेश बूब यांनी नामांकन दाखल केले. यावेळी आयोजित प्रचारसभेत त्यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी देणाऱया देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. आमदार श्रीकांत भारतीय यांचे आई-वडील घरात एकटेच असताना त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. आपल्या माणसांच्या घरावर हल्ला करणाऱयांना ‘भाजप’ने उमेदवारी देणे योग्य नाही. जिह्यात भाजपच्या पालकमंत्र्याला ‘बालकमंत्री’ म्हणणारे आणि त्यांना बांगडय़ा देण्याचा प्रयत्न करणाऱयांना भाजपने उमेदवारी दिली आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट दुर्दैवी!

संपूर्ण देशाला खऱया अर्थाने हिंदुत्व काय आहे, याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. असे असताना राणा दाम्पत्याचा थेट ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट हा दुर्दैवी होता, असे बच्चू कडू म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;