Video – चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ गावातून हाकलला
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एका गावातून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचाररथ हाकलण्यात आला आहे. गावात या प्रचाररथाने प्रवेश करताच एका गावकऱ्याने तो अडवला आणि आधी पंधरा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. ‘बोगस विकास आम्हाला नको. अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखे घोटाळेबाज या पक्षात गेले आणि यांचा प्रचार आमच्या गावात करता का, असा प्रश्न या गावकऱ्याने केला. चारशेचा गॅस सिलिंडर बाराशेवर नेवून ठेवला. चला निघा इथून, असा दमही या गावकऱ्याने दिला. सध्या हा व्हीडिओ समाज माध्यमावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आर्णी तालुक्यातील खेडी (पुरुषोत्तम) येथील असल्याचे सांगितले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List