विषारी सापापेक्षाही भाजप भयंकर! ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल
Lok Sabha Election 2024- लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या काही दिवसांत पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कूचबिहारमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एकवेळ विषारी सापांवर विश्वास ठेवा पण भाजपवर नको, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
कूचबिहारमधील जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर आरोप केले असून केंद्र सरकारला टोला लगावला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर तुम्हाला तुमच्या विजयावर एवढा विश्वास आहे तर मग तुम्ही छापेमारी का करत आहात? एनआयए-बीएसएफसोबत तुमचे भाजप नेते का फिरत आहेत? लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आचारसंहिता पाळत नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपशासित केंद्र सरकारने तीन वर्षांत रस्ते बनवण्यासाठीचा निधी दिलेला नाही. तसंच, आवास योजनेसाठीचा निधीही अद्यापपर्यंत मिळालेला नाही. एकवेळ तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, त्याला पाळू शकता, पण भाजपवर विश्वास ठेवू शकत नाही. कारण भाजप देशाला बरबाद करतोय, अशी कडाडून टीका यावेळी बॅनर्जी यांनी केली.
#WATCH कूचबिहार: पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने कहा, “…सभी एजेंसी को काम पर लगाया गया है। राज्य के अधिकारियों का तबादला किया जा रहा है। जो सेंट्रल एजेंसी है-NIA, CBI, IT इनमें से कितने अधिकारियों का तबादला हुआ?… बंगाल तो मैं संभाल लूंगी, मेरे रहते उनकी हिम्मत नहीं… pic.twitter.com/Z0J4dt9S9t
— ANI_HindiNews (@AHindinews) April 4, 2024
निवडणुकीदरम्यान बंगालवर निवडणूक आयोग लक्ष ठेवेल, असे पीएम मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानावर ममता बॅनर्जी यांनी हल्ला चढवला. ‘तुम्ही निवडणूक आयोग विकत घेतला आहे का? भाजपमध्ये असणे म्हणजे तुमचे चारित्र्य स्वच्छ आहे आणि तृणमूलमध्ये असणे म्हणजे तुम्ही चारित्र्यहीन आहात असा अर्थ होतो का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मोदींना केला आहे. ममता बॅमर्जी पुढे म्हणाल्या की, तृणमूल केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या धमक्यांना कधीच बधणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा, एनआयए, आयकर, बीएसएफ आणि सीआयएसएफ भाजपसाठी काम करत आहेत. भाजप फक्त “एक राष्ट्र, एक पक्ष” या तत्त्वावर चालतो, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारमधील भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ‘तुम्ही मंत्र्याच्या नावावर कलंक आहात. राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. आतापर्यंत किती केंद्रीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या? असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी या सभेत उपस्थित केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List