मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत; भाजप प्रवेशाच्या अफवांवरून प्रकाश राज यांनी फटकारले

मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत; भाजप प्रवेशाच्या अफवांवरून प्रकाश राज यांनी फटकारले

Lok sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी मोदी सरकारच्या हुकूमशाहीला डावलून पुन्हा घरवापसी केली आहे. तर वर्षानुवर्षे भाजपच्या धोरणांविरोधात आवाज उठवणारे अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी राजकारणात उडी घेतली आहे. यामध्ये प्रकाश राज यांच्या नावाचा समावेश असल्याचे ट्विट व्हायरल होत आहे. यापर्श्वभूमीवर अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपविरोधात एक वक्तव्य केले आहे. त्यांचे हे विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी नेहमीच भाजपच्या विरोधात वक्तव्यं केली आहेत. त्यांच्या धोरणांवर ते वारंवार प्रश्न उपस्थित करून अन्यायाविरोधातील आपला राग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त करत असतात. यातच आता द स्किन डॉक्टर नावाच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल झाली. यामध्ये प्रकाश राज 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा करण्यात आला. याचा स्क्रिनशॉट घेत प्रकाश राज यांनी ट्विट करत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. “मला वाटतं त्यांनी प्रयत्न केला. पण ते मला विकत घेण्याइतके श्रीमंत नाही हे त्यांच्या लक्षात आलं असेल… मित्रा तुला काय वाटतं?” अशा शब्दांत प्रकाश राज यांनी पलटवार केला आहे.

प्रकाश राज यांच्या या ट्विटवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इतर कलाकारांप्रमाणे तुम्ही देखील भाजपमध्ये जाणार का? असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात आले आहेत. दरम्यान, कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी इतर कोणत्याही पक्षात न जाता थेट भाजपमध्ये प्रवेश केला. अशा स्थितीत प्रकाश राज लवकरच भाजपचे सदस्यत्वही घेतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र तूर्तास त्यांनी स्वत:च ट्विट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;