Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत दोन उमेदवारांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळे यांना वर्धा, भास्कर भगरे यांना दिंडोरीतून, सुप्रिया सुळे यांना बारामती, डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर आणि निलेश लंके यांना नगरमधून उमेदवारी घोषित झाली आहे. हे पाच उमेदवार आणि आताचे दोन उमेदवार मिळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आतापर्यंत एकूण सात उमेदवारांची घोषणा केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;