शिवसेनेबरोबर वाद झाल्यावर कंगनाला कोण देणार होतं गन?, काय घडलं त्यावेळी?

शिवसेनेबरोबर वाद झाल्यावर कंगनाला कोण देणार होतं गन?, काय घडलं त्यावेळी?

अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. कंगना भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून लढत आहे. कंगनाने तिच्या प्रचारात मुसंडी घेतली आहे. आपल्या रोखठोक मतांमुळे कंगना नेहमीच चर्चेत राहिली आहे. रोखठोक मतांमुळे तिला नुकसानही सोसावं लागलं. पण ती आपल्या मतांवर ठाम राहिली. तिने कधी माघार घेतली नाही. शिवसेनेसोबतचा तिचा वाद तर सर्वज्ञात आहे. शिवसेनेसोबत वाद झाल्यानंतर तिला थेट गन मिळणार होती. तिच्या वडिलांनीच तिला गन आणून देऊ का? असं विचारलं होतं. काय होता हा रंजक किस्सा?

अभिनेत्री कंगना रणौत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. प्रचार करतानाच अनेक गोष्टी बिनधास्तपणे सांगताना दिसत आहे. खासकरून शिवसेनेसोबत तिने पंगा घेतला होता. त्याबाबत तिला विचारलं जात असून तीही या विषयावर भरभरून बोलताना दिसत आहे. शिवसेनेसोबतचं कांड झाल्यानंतर मला धमक्या येत होत्या. माझ्या वडिलांकडे एक परवाना असलेलं पिस्तुल आहे. त्यांना मला येत असलेल्या धमक्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मलाही एक गन घेऊन देतो म्हणून सांगितलं. पण मला त्यांचं बोलणं फनी वाटलं. मी त्यांना गन नको म्हणाले होते, असं कंगनाने एका मुलाखतीत म्हटलंय.

घरात सर्व अधिकारी

कंगनाचे आजोबा आयएएस रँकचे अधिकारी होते. तिचे पणजोबा 10 ते 15 वर्ष आमदार होते. तिचे काका डॉक्टर आहेत तर कोणी ऑफिसर्स आहेत. कंगनालाही डेप्युटी कमिश्नर किंवा डॉक्टर बनण्याचा आग्रह करण्यात आला होता. पण तिचं सर्व लक्ष अभिनयात होतं. त्यामुळे ती अभिनय क्षेत्राकडे वळली.

लतादीदींची गाणी आवडायची

कंगना लहानपणी अत्यंत उदास राहायची. तिला गझल ऐकणं आवडायचं. कंगनाच्या आईनेही कंगना लहानपणी उदास राहायची असं सांगितलं. तू लहानपणी इतकी उदास का असायची? असा सवाल कंगनाला करण्यात आला. त्यावर तिने मजेदार उत्तर दिलं. लहान मुलांना गझल आणि कवितांशी संबंध असतो. क्रिएटिव्हली ते एकीकडेच झुकलेले असतात. पण मी उदास नसायचे. मला जुनी गाणी ऐकायला आवडायची. खासकरून लता मंगेशकर यांची गाणी ऐकायला आवडायची, असं तिने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;