2024 मध्ये प्रेक्षकांना घाबरवायला येत आहेत ‘हे’ चित्रपट; वाचा बातमी
2024 मध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच भयपट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे वर्ष हॉरर चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. या वर्षात अनेक भयपट चित्रपटांचे सीक्वेल चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.
द फर्स्ट ओमन (20th सेंच्युरी स्टुडिओ): हा भयपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2024 मधील सर्वात मोठा भयानक चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटाची कथा ही रोममधील एका तरुण अमेरिकन महिलेची कथा आहे. ‘द फर्स्ट ओमेन’ हा 1976 मध्ये आलेल्या ‘द ओमेन’ चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षाही भयावह असण्य़ाची शक्यता आहे.
स्त्री २: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा बहुचर्चित चित्रपट स्त्री 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये आला होता, जो लोकांना खूप आवडला होता. यानंतर आता स्त्री 2 या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची कथा उत्तमप्रकारे मांडण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये एका चेटकीणीचे भयानक आणि उत्कंठावर्धक रूप पाहायला मिळणार आहे.
भूल भुलैय्या ३: ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूल भुलैया या चित्रपटाच्या तिसऱ्य़ा भागात आणखी भयानक प्रसंगांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रूह बाबा’ च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूल भुलैया 2 हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याआधी 2007 मध्ये प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भुलैया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला होता. 2024 च्या दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, राजपाल यादव, कियारा अडवाणी सारखे कलाकार दिसणार आहेत.
काकुडा: 2024 मधील आगामी हॉरर- कॉमेडी चित्रपट काकुडामध्ये सुप्रिसद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. या चित्रपटात उत्कंठावर्धक प्रसंग मजेशीर पद्धतीने रेखाटण्याचे काम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. दरम्यान या चित्रपटाची रिलीझची अचूक तारीख अद्याप घोषित झालेली नाही. परंतु डिसेंबर 2024 पर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्य़ाच्या चर्चा आहे. काकुडा हा चित्रपट भयाने आणि हास्याने भरलेली सफर असणार आहे.
ए क्वाइट प्लेस: डे वन: समीक्षकांनी गौरवलेला हा साय-फायवर आधारित चित्रपट हा माणुसकीच्या विरोधात असणाऱ्या एलेन इनव्हॅशनच्या भयानक सुरुवातीचा पूर्वाध आहे. या चित्रपटाचा नवीन भाग आपल्याला एलेन इनव्हॅशच्या सुरुवातीच्या भयानक काळात घेऊन जाणार आहे. हे अंध पण आवाजावर शिकार करणारे प्राणी पृथ्वीवर उतरत असताना अराजकतेच्या पहिल्या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तयार व्हा. माणुसकी या न दिसणाऱ्या दहशतीशी कशी झुंजते, अशा जगात टिकून राहण्याचा मार्ग शोधत आहे जिथे अगदी किंचित आवाजही प्राणघातक अंत आणू शकतो हे आपण पाहू.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List