राहता येथील अंगणवाडी सेविकेच्या लेकीची भरारी, गरिबीवर मात करत झाली एमबीबीएस

राहता येथील अंगणवाडी सेविकेच्या लेकीची भरारी, गरिबीवर मात करत झाली एमबीबीएस

कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली, तर आकाशालाही गवसणी घालता येते. राहता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील राजाराम कालेकर या साई संस्थानमधील कर्मचारी व आई अंगणवाडी सेविका सुरेखा या दाम्पत्याची मुलगी प्रियंका सुरेखा राजाराम कालेकर हिने आपल्या कर्तृत्वाने दिला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही खेडेगावात राहून, अवघड समजली जाणारी एमबीबीएस पदवी प्रियंका ने नुकतीच मिळवली आहे. यामुळे सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे.

मूळची राहता तालुक्यातील कोऱ्हाळे या गावातील प्रियंका राजाराम कालेकर खेड्यातच लहानाची मोठी झाली. तिचे वडील साई संस्थान कर्मचारी आहेत, तर आई अंगणवाडी सेविका आहे. यामुळे प्रियंकाच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत तिला 585 गुण मिळाले. त्या आधारे तिला पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. या कॉलेज मधील अनेक मुलं हे सधन घरातली होती. यामुळे या मुलांच्या मौजमजांच्या इच्छा सहज पूर्ण होत होत्या.मात्र प्रियंकाला शिक्षणाच्या साहित्यासाठीही घरी फोन करून पैसे मागवताना अनेक वेळा विचार करायला लागायचा, यामुळे अनेक वेळा इच्छा असतानाही तिला त्या पूर्ण करता आल्या नाहीत,असं ती सांगते.

कोऱ्हाळे येथील श्रीगणेश शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी सांगितले की, प्रियंकाने गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळविले. श्री गणेश शिक्षण संस्थेत तिने विज्ञान शाखेत अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत देखील तिने 95 टक्के गुण मिळविले.फिजिक्समध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळविले होते. डॉ. प्रियंका कालेकर हिने आई-वडिलांचे स्वप्न साकार केले, तसेच श्रीगणेश शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक देखील वाढविला. तिचा भाऊ अनिकेत देखील इंजिनिअर झाला. या भावंडांना घडविण्यात त्यांच्या आई- वडिलांचा मोठा वाटा आहे.तिने एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.अशा शब्दात प्राध्यापक शेटे यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रियंकाला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी होती. लहानपणापासून मार्गदर्शन नसताना तिने स्वतःच्या आयुष्याच्या स्वप्नांचा शोध घेतला. शैक्षणिक सहित्याशिवाय कुठलाच हट्ट केला नाही. आज एका संस्थान कर्मचारी व अंगणवाडी सेविकेची मुलगी एमबीबीएस झाल्याचा मला वडिल म्हणून प्रियंकाचा अभिमान वाटतो, अशा भावना तिचे वडील राजाराम कालेकर व आई सुरेखा कालेकर यांनी व्यक्त केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;