वरळीत साजरा होणार ‘जल्लोष जयंतीचा’, त्यागमूर्ती माता रमाई यांचीही 126वी जयंती धुमधडाक्यात साजरी होणार
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती त्याचबरोबर त्यागमुर्ती माता रमाई यांची 126वी जयंती तसेच डॉ बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या लग्नाचा 118 वा वाढदिवस असा एकत्र दैदिप्यमान सोहळा वरळीच्या जांबोरी मैदानात मोठ्या जल्लोषात, भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.
भिमोत्सव समन्वय समिती वरळी-2024, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती उत्सवाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लग्नाचा वाढदिवस सोहळा एकत्रितपणे शनिवार, 6 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता साजरा करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. 133 किलोचा केक, डोळयाचे पारणे फिटणारी आतषबाजी, अवकाशातून होणारी पुष्पवृष्टी या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. यासह ख्यातनाम बॅालीवूड पार्श्वगायिका वैशाली माडे, गायक संदेश उमप, शकुंतला जाधव, शिरीष पवार, इंडियन ॲायडॅाल फेम मुकेश पांचोली , प्रविण डोणे , बिगबॅास फेम मेघा घाडगे, अनुजा कामत व श्रेयस तळपदे , गौरव मोरे आदी सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व त्यांचे पालक यांना लाखोची बक्षिसे, पैठणी, सुटाचे कपडे, सोन्याची नथनी, चांदीचे नाणे, शालेय साहित्य, नऊवारी लुगडी, हजारो रूपयांचे गिफ्ट वाऊचर लकी ड्रॉ च्या माध्यमातून महाराष्ट्र बाजार पेठ, दादर यांच्याकडून देण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List