Lok Sabha Election 2024: सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखेंना केले ट्रोल

Lok Sabha Election 2024:  सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखेंना केले ट्रोल

नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजी येते का असे म्हणत एक प्रकारे त्यांचा अपमान करणाऱ्या भाजप उमेदवार सुजय विखे यांना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. आपले आजोबा केवळ चौथी पास होते, त्यांना सुद्धा अशाच पद्धतीची वागणूक देण्यात आली होती, अशा प्रकारचे मेसेज टाकून विखेंची कुंडली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली जात आहे.

सुजय विखे म्हणाले की, ”मी जी भाषा बोलतो ती भाषा निलेश लंके यांनी बोलून दाखवावे असे चॅलेंज भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी देऊन जर ते बोलले तर मी उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार नाही” असे आव्हान त्यांनी जनतेला दिलेले होते. त्यानंतर बुधवारी निलेश लंके यांनी ”सुजयजी, तुम्हाला जनसामान्यांच्या मराठी भाषेत कळत नसल्याचे समजले. तुमच्या सोईसाठी एक इंग्रजीत संदेश पाठवत आहे. Hard work beats money and muscle” असे लिहून सडेतोडपणे उत्तर दिले. मात्र एवढ्यावरच आता कोणी थांबले नसून आता जनता चांगली सोशल मीडियाच्या माध्यमातून विखे याना ट्रोल करू लागली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखे यांना आपल्या खासदारकीचा गर्व चढलेला आहे, विकास कामे सांगण्यापेक्षा आता कुठल्या तरी मुद्द्यावर येऊन निवडणूक वेगळ्या मार्गाने न्यायची असा हा विखे घराण्याचा डाव आहे. बुधवारी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखे यांच्यावर थेट टीका करण्यात आली. आपले आजोबा विठ्ठलराव विखे हे केवळ चौथी पास होते मात्र त्यांनी कधीच कुणाशी अशी थट्टा केली नाही, उलट त्यांनी वेळोवेळी मान अपमान सहन केला. पण ते कधीच कोणाला उलटून बोलले नाहीत किंवा पैशाचाही गर्व केला नाही, यास अनेक उदाहरणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली तसेच सुजय विखे यांचे आजोबा म्हणजेच पद्मश्री बाळासाहेब विखे हे सुद्धा कशा पद्धतीने कारभार करत होते याची उदाहरणे सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन एक प्रकारे सुजय विखे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी चांगलेच झापले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;