मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीमत्वाचं वर्णन करणारं ‘मर्दमावळा’ धडाकेबाज गाणं रिलीज

मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीमत्वाचं वर्णन करणारं ‘मर्दमावळा’ धडाकेबाज गाणं रिलीज

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे. आमरण उपोषण करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यांच्या आंदोलनाने आणि वारंवार केलेल्या आरक्षणाच्या मागणी महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा झाली. ओबीसीमधून मराठा समाजारा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आजही लढा देत आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजही उभा राहिल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यांच्या या संघर्षावर आधारित एक सिनेमा येतो आहे. ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट येत्या 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील गाणं आता रिलीज झालं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीमत्वाचं वर्णन करणारं ‘मर्दमावळा’ धडाकेबाज गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.

‘मर्दमावळा…’ गाणं रिलीज

‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांआधी रिलीज झाला. ‘उधळीन मी…’ या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आता या चित्रपटातलं ‘मर्दमावळा…’ हे धडाकेबाज गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गायक दिव्य कुमार यांनी ‘मर्दमावळा…’ हे गाण स्वरबद्ध करण्यात आल आहे. येत्या 26 एप्रिल रोजी ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कलाकार कोण-कोण आहेत?

‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांने साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शन कुणी केलं?

शिवाजी दोलताडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांनी धुमस, मुसंडी, मजनू आदी चित्रपटांसाठी म्हणून दिग्दर्शक काम पाहिलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;