Arvind Kejriwal : केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी केलेली याचिका फेटाळली

Arvind Kejriwal : केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी केलेली याचिका फेटाळली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शिवाय हे पद सोडण्याचा निर्णय न्यायालयाने केजरीवाल यांच्यावर सोपवला आहे. वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहीत महत्त्वाचे असल्याची टिप्पणी यावेळी न्यायालयाने अनेकदा केली.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने Arvind Kejriwal यांना अटक केली आहे. त्यांनी आता तुरुंगातूनच सरकार चालविण्याचा निर्धार केला आहे. अशातच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांनी जनहित याचिकाद्वारे केली होती. या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रितम सिंह अरोरा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी गुप्ता यांनी केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात अटक झाली आहे. यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळली आहे. हा अरविंद केजरीवाल यांचा वैयक्तिक निर्णय असेल. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदावर राहावे की राहू नये? हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असे न्यायालयाने म्हटले. तसेच कधी-कधी व्यक्तिगत हितापेक्षा राष्ट्रहीत महत्त्वाचे असते, अशी टिप्पणीही केली.

न्यायालयाने म्हटले की, ‘या मुद्द्यावर निर्णय घेऊ शकत नाही. त्यावर दिल्लीचे नायब राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी निर्णय घेतला पाहिजे. सरकार चालत नाही हे आम्ही कसे जाहीर करू शकतो? नायब राज्यपाल यासंबंधी निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. त्यांना आमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. आम्ही त्यांना सल्ला देऊ शकत नाही. कायद्यानुसार त्यांना जे काही करावे लागेल ते करतील. या याचिकेचे उत्तर नायब राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे आहे. याचिकाकर्ते त्यांच्याकडे जाऊ शकतात.” त्यानंतर गुप्ता यांनी ही याचिका मागे घेतली आहे.

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यासाठी याआधीही एक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती.  नायब राज्यपाल यांनी निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने तेव्हाहीम्हटले होते. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ते तिहारच्या तुरुंगात आहेत. 1 एप्रिलला न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून सातत्याने होत आहे. तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर राहून तुरुंगातून सरकार चालवतील, असे ‘आप’चे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;