प्रियकराला घरी ठेवण्यासाठी नवऱ्याने नकार दिल्याने महिला चढली वीजेच्या खांबावर

प्रियकराला घरी ठेवण्यासाठी नवऱ्याने नकार दिल्याने महिला चढली वीजेच्या खांबावर

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने तिचे अवैध संबंध उघड झाल्याने आत्महत्येची धमकी देत वीजेच्या खांबावर चढली. गेली सात वर्षे तीचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. याबद्दल तिच्या नवऱ्याला माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध दर्शवला तसेच प्रियकराला घरी ठेवण्यासाठी नकार दिल्याने तिने असे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या स्थानिक मीडियाच्या अहवालानुसार, महिला तीन मुलांची आई असून महिलेचे गेली सात वर्षे शेजारीच्या गावातील तरुणासोबत अवैध संबंध होते. या संबंधाबद्दल नवऱ्याला समजल्याने तो तिला विरोध करू लागला. तसेच त्याने प्रियकरासमवेत सगळे संबंध तोडण्याचा देखील सल्ला दिला. नवऱ्याने विरोध केल्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराने देखील रेल्वेखाली येण्याचा प्रयत्न केला.

 नवरा विरोध करत असल्याने महिलेने अलीकडे पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. तेथील स्थानिक लोकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत पुन्हा खाली उतरण्याकरीता सांगताना दिसत आहेत. स्थानिकांसमवेत महिलेचा पती, प्रियकर आणि पोलिस देखील तिला समजवताना दिसत आहेत.

महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेला प्रियकरासोबत राहण्याची इच्छा आहे, नवऱ्याला तिचे संबंध समजल्यानंतर तिने आपल्या पतीकडे प्रियकराला घरी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी हट्ट धरला. तीन लहान मुले घरात असल्याने नवऱ्याने यासाठी परवानगी नाकारल्याने ती नवऱ्याला वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;