114 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले. जुआन हे व्हेनेझुएलाचे रहिवासी होते. फेब्रुवारी 2022 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्या वेळी त्यांचे वय 12 वर्षे 253 दिवस होते. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर जुआन यांच्या मृत्यूची घोषणा केली. वयाच्या पाचव्या वर्षी जुआन यांनी वडील आणि भावांसोबत शेतात काम करायला सुरुवात केली. त्यांना ऊस आणि कॉफीच्या लागवडीत मदत करायचे. यानंतर ते शेरीफ (स्थानिक पोलीस अधिकारी) झाले आणि त्यांनी आपल्या भागातील जमिनीशी संबंधित समस्या सोडविण्यास सुरुवात केली. मात्र या काळात त्यांनी शेती सुरूच ठेवली. 1938 मध्ये जुआनने एडिओफिना गार्सिया नावाच्या महिलेशी लग्न केले. त्यांच्या पत्नीचे 1997 मध्ये निधन झाले. 2022 मध्ये जेव्हा जुआन यांना सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता. त्यांनी कोणतीही विशेष औषधे घेतली नाहीत.
जुआन ‘फॅमिली मॅन’
जुआन वो हे व्यवसायाने शेतकरी होते. कठोर परिश्रम, वेळेवर विश्रांती आणि रोज एक ग्लास उसापासून बनलेली दारू पिणे हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. जुआन यांचा जन्म 27 मे 1909 रोजी झाला. त्यांना 11 मुले, 41 नातवंडे, 18 पणतू आहेत. ते खऱया अर्थाने ‘फॅमिली मॅन’ होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List