आयआयटी मुंबईचे विद्यार्थी जॉब ऑफर्सच्या प्रतीक्षेत
जानेवारीमध्ये आयआयटी मुंबईतील 85 विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपयांची जॉब ऑफर्स मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आतादेखील आयआयटी पॅम्पसमध्ये प्लेसमेंट सुरू असून यात देश-विदेशातील अनेक पंपन्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र तरीदेखील आयआयटी मुंबईतील 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही पंपनीकडून नोकरीची ऑफर्स मिळालेली नाही. आयआयटी मुंबईतील नोंदणीकृत दोन हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना यंदा कोणतीही प्लेसमेंट मिळालेली नाही. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपवर हा डेटा शेअर करण्यात आला आहे. सध्या आयआयटीमध्ये सुरू असलेली प्लेसमेंटची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List