मी माझ्या पतीपासून… अमिताभ बच्चन यांच्यासोबत नातं कसं ? जया बच्चन यांनी केला खुलासा

मी माझ्या पतीपासून… अमिताभ बच्चन यांच्यासोबत नातं कसं ? जया बच्चन यांनी केला खुलासा

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा पॉडकास्ट सध्या खूप गाजतोय. ‘व्हॉट द हेल नव्या’या शोचा सध्या दुसरा सीझन सुरू असून तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पॉडकास्टमध्ये नव्या सह तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चनदेखील सहभागी होतात. नव्याने तिच्या शोच्या शेवटच्या एपिसोडचा नवा प्रोमो जाहीर केला आहे. त्यामध्येही ती आई आणि आजीसोबत मैत्री वर बोलताना दिसली. याच पॉडकास्टदरम्यान जया बच्चन यांनी त्यांचे अमिताभ बच्चनसोबत नातं कसं आहे हे देखील सांगितलं. नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी महत्वाचा खुलासा केला.

अमिताभ यांच्याबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन ?

‘ माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्या घरातच आहे ‘ असे प्रोमोच्या सुरूवातीला जया म्हणाल्या. त्यावर नव्या म्हणाली, ‘जर दोन लोक फक्त मित्र असतील आणि त्यांनी त्यांच्या मैत्रीत रोमान्स आणला तर ते बरोबर आहे का?’ तिच्या प्रश्नाला उत्तर देताना जया म्हणाल्या, ‘हे बरोबर आहे. माझा नवरा माझा चांगला मित्र आहे आणि मी त्यांच्यापासून काहीही लपवत नाही. नव्या म्हणाली, ‘आजीचे ( जया बच्चन) मित्र घरी येतात तेव्हा मला खूप मजा येते आणि ते तिच्याशी अशा पद्धतीने बोलत असतात, आपण तसं बोलण्याचा विचारही करू शकत नाही. ते पाहून मला खूप मजा येते, कारण ते आजीला त्रास देतात असंही नव्या म्हणाली.

मैत्रीबद्दल श्वेता बच्चन म्हणाली..

‘आमची मुलं आमची बेस्ट फ्रेंड आहेत असं लोकं का म्हणतात ते मला कळत नाही? असं मत श्वेताने मांडलं. ‘पण तुम्ही मुलांचे मित्र तुझी मैत्री का होऊ शकत नाहीत?’ असा सवाल जया यांनी श्वेताला विचारला. ‘आपम मित्र नाहीयोत. तू माझी आई आहेस. आपल्यात एक सीमा आहे जी मी कधीही ओलांडणार नाही, असं श्वेता म्हणावी. ‘माझी मुलं ही माझी मुलं आहेत आणि माझे मित्र हे मित्र’ असे सांगत दोन्ही नाती वेगळी असल्याचं श्वेताने नमूद केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;