सोलापुरात थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविणार; महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांची माहिती

सोलापुरात थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविणार; महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांची माहिती

महापालिका प्रशासनाने मार्च अखेरपर्यंत कर थकबाकीदारांच्या मिळकती सील करणे त्यांचे नळ बंद करण्याची मोहीम राबविल्यानंतर आता एप्रिल आणि मे महिन्यात थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर किभागाचे प्रमुख युकराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली कर विभागाच्या नऊ पथकांनी मार्च महिन्यात थकबाकी कसुली मोहीम राबविली. यावेळी थकबाकीदारांच्या मिळकती सील करणे, नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबकिली. यामुळे जवळपास 20 कोटी रुपयांचा कर मार्चमध्ये वसूल झाला. मात्र, अद्यापही मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. यामुळे जे मिळकतदार नोटिसा बजाकून आणि सूचना देऊनही थकीत मिळकतकर भरत नाहीत, अशा मोठय़ा थकबाकीदारांच्या मिळकतींवर एप्रिल क मे महिन्यात बोजा चढकिण्याची मोहीम राबकिण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील प्रत्येक पेठनिहाय दहा थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढकिण्यात येणार आहे.

दरम्यान, लोकसभा निकडणुकीनंतर साधारणतŠ जून महिन्यात बोजा चढकिलेल्या मिळकतींची लिलाक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कारकाईची मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले.

चुकीची नोंद असल्यास दुरुस्ती करून घ्याकी

ज्या मिळकतदारांना कराच्या नोंदी चुकीच्या आढळून आल्या आहेत, त्यांनी महापालिका मिळकतकर किभागाकडे कागदपत्रांसह अर्ज कराकेत. चुकीची नोंद असल्यास ती नियमानुसार दुरुस्त करून देण्यात येईल, असे उपायुक्त लोकरे यांनी सांगितले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;