अंतराळातून तीन वेळा दिसणार सूर्यग्रहण
अमेरिका आणि अन्य काही भागांत येत्या 8 एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण आहे. याची प्रतीक्षा जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना आहे. अंतराळातून हे खग्रास सूर्यग्रहण पाहता येईल. पृथ्वीपासून 400 किलोमीटरच्यावर इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये असलेले अंतराळवीर सूर्यग्रहण अंतराळातून पाहतील. तेही एकदा नव्हे तर तीनदा. सध्या आयएसएसमध्ये क्रू-
8 चे अंतराळवीर उपस्थित आहेत. सूर्यग्रहणाचा प्रभाव मॅक्सिको, पॅनडा आणि अमेरिकेत असेल तेव्हा स्पेस सेंटरमधील अंतराळवीर सूर्यग्रहण बघू शकतील.
ग्रहणावर नासाचा वॉच
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर पडणारा सूर्याचा प्रकाश चंद्र अडवून धरतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा अंधार पडतो. 8 एप्रिल रोजी अमेरिका, मॅक्सिको आणि पॅनडासह अनेक शहरांत दिवसा अंधार होईल. इंटरनॅशनल स्पेस सेंटरच्या व्यतिरिक्त नासाही हे ग्रहण पॅमेऱयात पैद करेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List